Hello महाराज,
Sorry… तुम्हाला नेमकी कशी हाक मारायची हे मला कळत नाहीये.. तसा मी eighth standard मध्ये आलोय.. पण english medium ना.. आणि ते मराठीत letter writing वगैरे mom लिहून द्यायची मला.. पण आज मुद्दाम तुमच्याशी बोलावंसं वाटलं, म्हणून हे पत्र..
सर्वात आधी तुम्हाला अभिवादन. जयंतीच्या शुभेच्छा कशा द्यायच्या ?
आमच्याकडे काही जण एकमेकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतात, का, कोणास ठाऊक.
तुमच्याकडे special power असल्यामुळे तुम्ही आजही लोकांशी… म्हणजे रयतेशी.. . right word ना? बोलता असं मी त्या movie मध्ये पाहिलंय.. Actually मी तुमच्या stories ऐकल्या आहेत आजीकडून.. पण आता आजी आमच्यासोबत राहत नाही.. म्हणजे आम्ही तिच्यासोबत राहत नाही.. आणि मला मराठी fluently वाचता येत नाही.. पण मी जमेल तशा वाचतो तुमच्या शौर्यकथा… मला मराठी medium ला का नाही घातलं dad ने…
Last week पासून Facebook वर ना सगळे #doodleforShivray असं campaign करतायत.. खूपच आवडलं मला ते.. मी पण post केली… 55 likes पण आले… पण तरी google ने तुमचं doodle केलं नाही. तशी तुमची दखल जगाने घेतल्ये… google वरच वाचलंय मी.. आणि in case doodle नाही बनलं.. तर आमच्या मनातला आदर काय कमी होणार आहे का? तुमचं स्थान आजही तितकंच वर आहे… आणि कायम राहील.
दुसरं.. ते अरेबिअन सी मध्ये तुमच्या शिवस्मारकाचं काहीतरी planning सुरु आहे म्हणे. कसलं sollid असेल. घोड्यावर बसलेला तुमचा भव्य असा पुतळा… तिकडे library वगैरे करायचं म्हणत आहेत… i hope पुढेही सगळं plan केल्याप्रमाणेच होईल. नाहीतर नुसते पुतळे काय कामाचे. लोक मुलाबाळांना घेऊन फिरायला येतील.. समुद्रावर सेल्फी काढतील.. at Shivsmarak with Wife, son and 2 others.. feeling proud… फोटो पोस्ट करताना गूगल करून तुमचे छान कोट्स टाकतील. पण बाकी शून्य. भेळवाले, नारळपाणी, गोळे, यांचे छान stall लागतील, tourist तिकडे कचरा करतील…
लोकांच्या पैशाची अशी उधळपट्टी तुम्हाला आवडते का हो? नाही ना? मग सांगा ना कोणाला तरी स्वप्नात येऊन. तुमच्या काळात तुम्ही बांधलेले, जिंकलेले गड किल्ले जतन केले… त्यांची माहिती दिली.. तर ती तुम्हाला खरी श्रद्धांजली ठरेल. आज पुतळ्याला घातलेली फुलं उद्या निर्माल्य होतील, पण ही माहिती आयुष्यभरासाठी समृद्ध करेल. दांडपट्टा, तलवारबाजी, असे खेळ आम्हाला शिकवायला हवेत, तुमच्या काळातील पोवाडे, ते विचार आज पोहचले, तर आम्हाला ‘शिवाजी’ कळाला, असं म्हणता येईल.. नाहीतर इकडून तिकडे copy, paste, share करायची शिवभक्ती
आमच्या समोरच्या building मध्ये एके ठिकाणी तुमच्या पुतळ्याला दर वर्षी 19th February ला हार घालतात. आणि बाजूच्या building मधले आज काहीच करत नाहीत, ते म्हणतात, तिथीनुसार पुढच्या महिन्यात येईल तेव्हा celebration. ह्याला काय अर्थ. महाराज, तुम्ही लोकांना जोडायला शिकवलं आणि हे तुमच्या birth date वरुन तोडतात. आजकाल दोन birthdate तर फक्त शाळेच्या admission च्या वेळीच घालतात. पुढच्या वर्गात सरकवण्यासाठी.
महाराज, तुमच्या दरबारात अनेक मुसलमान माणसं होती, असं मी ऐकलं आहे. म्हणजे तुम्ही माणसा-माणसामध्ये कधी फरक केलाच नाही.. मग तुमची शिकवण घेतो, असं म्हणवणारी माणसं उगाच का हिंदू-मुस्लीम करत बसतात. आजही अनेक मुस्लीम बांधव तुमच्या विचारांचं पालन करतात म्हणे… मग हे राजकारण का?
जाऊदे.. मी खूप वेळ घेतला तुमचा… please जमलं तर मला reply द्या.
– तुमचा छोटा शिवभक्त
By: अनिश बेंद्रे, एबीपी माझा, मुंबई