Friday, 19 February 2016

8th standard मधल्या student चं शिवरायांना पत्र

Hello महाराज,

Sorry… तुम्हाला नेमकी कशी हाक मारायची हे मला कळत नाहीये.. तसा मी eighth standard मध्ये आलोय.. पण english medium ना.. आणि ते मराठीत letter writing वगैरे mom लिहून द्यायची मला.. पण आज मुद्दाम तुमच्याशी बोलावंसं वाटलं, म्हणून हे पत्र..

8th standard मधल्या student चं शिवरायांना पत्रसर्वात आधी तुम्हाला अभिवादन. जयंतीच्या शुभेच्छा कशा द्यायच्या ? आमच्याकडे काही जण एकमेकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतात, का, कोणास ठाऊक.

तुमच्याकडे special power असल्यामुळे तुम्ही आजही लोकांशी… म्हणजे रयतेशी.. . right word ना? बोलता असं मी त्या movie मध्ये पाहिलंय.. Actually मी तुमच्या stories ऐकल्या आहेत आजीकडून.. पण आता आजी आमच्यासोबत राहत नाही.. म्हणजे आम्ही तिच्यासोबत राहत नाही.. आणि मला मराठी fluently वाचता येत नाही.. पण मी जमेल तशा वाचतो तुमच्या शौर्यकथा… मला मराठी medium ला का नाही घातलं dad ने…

Last week पासून Facebook वर ना सगळे #doodleforShivray असं campaign करतायत.. खूपच आवडलं मला ते.. मी पण post केली… 55 likes पण आले… पण तरी google ने तुमचं doodle केलं नाही. तशी तुमची दखल जगाने घेतल्ये… google वरच वाचलंय मी.. आणि in case doodle नाही बनलं.. तर आमच्या मनातला आदर काय कमी होणार आहे का? तुमचं स्थान आजही तितकंच वर आहे… आणि कायम राहील.
DOODLE
दुसरं.. ते अरेबिअन सी मध्ये तुमच्या शिवस्मारकाचं काहीतरी planning सुरु आहे म्हणे. कसलं sollid असेल. घोड्यावर बसलेला तुमचा भव्य असा पुतळा… तिकडे library वगैरे करायचं म्हणत आहेत… i hope पुढेही सगळं plan केल्याप्रमाणेच होईल. नाहीतर नुसते पुतळे काय कामाचे. लोक मुलाबाळांना घेऊन फिरायला येतील.. समुद्रावर सेल्फी काढतील.. at Shivsmarak with Wife, son and 2 others.. feeling proud… फोटो पोस्ट करताना गूगल करून तुमचे छान कोट्स टाकतील. पण बाकी शून्य. भेळवाले, नारळपाणी, गोळे, यांचे छान stall लागतील, tourist तिकडे कचरा करतील…

लोकांच्या पैशाची अशी उधळपट्टी तुम्हाला आवडते का हो? नाही ना? मग सांगा ना कोणाला तरी स्वप्नात येऊन. तुमच्या काळात तुम्ही बांधलेले, जिंकलेले गड किल्ले जतन केले… त्यांची माहिती दिली.. तर ती तुम्हाला खरी श्रद्धांजली ठरेल. आज पुतळ्याला घातलेली फुलं उद्या निर्माल्य होतील, पण ही माहिती आयुष्यभरासाठी समृद्ध करेल. दांडपट्टा, तलवारबाजी, असे खेळ आम्हाला शिकवायला हवेत, तुमच्या काळातील पोवाडे, ते विचार आज पोहचले, तर आम्हाला ‘शिवाजी’ कळाला, असं म्हणता येईल.. नाहीतर इकडून तिकडे copy, paste, share करायची शिवभक्ती

आमच्या समोरच्या building मध्ये एके ठिकाणी तुमच्या पुतळ्याला दर वर्षी 19th February ला हार घालतात. आणि बाजूच्या building मधले आज काहीच करत नाहीत, ते म्हणतात, तिथीनुसार पुढच्या महिन्यात येईल तेव्हा celebration. ह्याला काय अर्थ. महाराज, तुम्ही लोकांना जोडायला शिकवलं आणि हे तुमच्या birth date वरुन तोडतात. आजकाल दोन birthdate तर फक्त शाळेच्या admission च्या वेळीच घालतात. पुढच्या वर्गात सरकवण्यासाठी.

महाराज, तुमच्या दरबारात अनेक मुसलमान माणसं होती, असं मी ऐकलं आहे. म्हणजे तुम्ही माणसा-माणसामध्ये कधी फरक केलाच नाही.. मग तुमची शिकवण घेतो, असं म्हणवणारी माणसं उगाच का हिंदू-मुस्लीम करत बसतात. आजही अनेक मुस्लीम बांधव तुमच्या विचारांचं पालन करतात म्हणे… मग हे राजकारण का?

जाऊदे.. मी खूप वेळ घेतला तुमचा… please जमलं तर मला reply द्या.

– तुमचा छोटा शिवभक्त
By: अनिश बेंद्रे, एबीपी माझा, मुंबई

Thursday, 18 February 2016

इन्द्र जिमि

इन्द्र जिमि जृम्भा पर
बाडव सअंभ पर
रावण सदंभ पर
रघुकुल राज है !
पवन बारिबाह पर
संभु रतिनाह पर
ज्यों सहसबाह पर
राम द्विजराज हैं !
दावा दृमदंड पर
चीता मृगझुन्द पर
भूषण वितुण्ड पर
जैसे मृगराज हैं !
तेज तमअंस पर
कन्ह जिमि कंस पर
त्यों म्लेंच्छ बंस पर
शेर शिवराज हैं !          ------ कवि भूषण.


#DoodleOfShivray

अर्थ :
गरूड का दावा सदा नाग के समुह पर, दावा नाग जूह पर सिंह सिरताज को |
दावा पुरहूत को पहारन के कुलपर, पच्छिन के गोल पर दावा सदा बाज को |
भूषण अखंड नवखंड महि मंडल में, तम पर दावा रवि किरन समाज को |
पूरब पछाँह देश दच्छिन ते उत्तर लौ, जहॉं पातसाही तहॉं दावा सिवराज को ||


 गरूडाचा अधिकार जसा सर्पांच्या समुहावर, शूर सिंहाचा दावा ज्याप्रमाणे हत्तीच्या कळपांवर,इंद्राचा जसा पर्वतरांगावर, बहिरी ससाण्याचा पक्षिगणावर, सुर्यकिरणांचा ताबा ज्याप्रमाणे नवखंड पृथ्वीवरील अंधकारावर अखंडपणे चालतो तद्वतच पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत देशात जेथे जेथे यवनी बादशाही तेथे तेथे शिवाजी राजांचा अधिकार चालू झाला.

Meaning :
Like lord Indra against the demons,
Like underwater volcanic fire over the ocean
Like lord Ram of the raghus clan against boastful ravana,
As strong wind scatters the clouds of rain
As lord Siva destroyed rati's husband(kaamdev),
and Like parsurama destroyed sahastraarjuna -
Like fire which burns woods,
and a Cheetha on herd of deer ,
Like lion on hogs,
so says Bhushan.
Like a ray of light in darkness,
Like boy Krishna upon kansa,
So has descended king Shivaji ,the Tiger.
upon the clan of mlecchas(barbarians),

डोहाळे

शिवभारत या ग्रंथात परमानंदांनी जिजाऊ मॉसाहेब यांच्या डोहाळ्यांचे वर्णन केले आहे -
हत्ती वर , वाघावर आणि गडावर आरोहन करावे , शुभ्र छत्राखाली सुवर्ण सिंहासनावर बसावे . उंच झेंडा उभारावा , सुंदर चौर्या ढाळून घ्याव्यात , दुदुंभीध्वनी एेकावा , धनुष्यबाण , भाला , तलवार व चिलखत धारण करुन लढाया कराव्या , गड हस्तगत करावेत , विजयश्री मिळवावी , मोठ मोठी दाने करावित .
धर्म स्थापना करावी असे अनेक प्रकारचे डोहाळे जिजाऊ मॉसाहेबांना प्रतिदिन होऊ लागले...!
‪#‎doodleofshivray‬

शिवजन्माची घटका


             शास्त्रीबुवांनी बोटे मोजली घटकापाळांचे गणित मोजले .कुंडलीची घरे ग्रह धरू लागली. कुंडली मांडून होताच शास्त्रीबुवांनी जिजाबाईंकडे पाहिले.
             जिजाऊ म्हणाल्या - "शास्त्रीबुवा संकोच न करता स्पष्टपणे सांगा या पोराच्या वेळी दिवस गेले आणी घरादाराचा थारा उडाला कुणाचा कुणाला मेळ लागेना. रक्ताच्या नात्याने वैर पत्करलं, जहागिरीवर सोन्याचे नांगर फिरले, आजोबांचे छत्र हरले (लखुजी जाधव ज्यांचा विजापुरी दरबारात खून करण्यात आला), या मितीला या पोराचे वडील शत्रूमागे धावत आहेत. याचा थोरला भाऊ लहान त्याची ही या वणवणीतून सुटका नाही. सा-या मुलखाची अन्नान दशा झाली आहे. परमुलखात परठिकाणी ना माहेरी ना सासरी मी या मुलाला जन्म देत आहे. पोटात असता ही त-हा आता त्याच्या पायगुणाने आणखी काय धिंडवडे निघणार आहेत. तेवढे सांगून टाका"
हे ऐकून सा-यांचे चेहेरे व्यथित झाले. शास्त्रीबुवा मात्र शांतच होते व त्यांच्या चेह-यावरील लवलेश बदलला नाही व त्यांनी भविष्य सांगण्यास सुरवात केली, राणीसाहेब असे अभद्र मनात आणू नये , अशुभाचा मनाला स्पर्श ही होऊ देऊ नका. दुर्भाग्य संपल भाग्य उजाडलं प्रत्यक्ष सूर्य पोटी आला आहे. जिजाऊ खिन्न पणे हसल्या.
"मुलाची कुंडली सांगताना प्रत्येक शास्त्री हेच म्हणतो "
शास्त्री गंभीर झाले ते निश्चल आणि खणखणीत आवाजात बोलू लागले.
"राणीसाहेब असा अविश्वास धरू नका. या शास्त्र्याचं भाकीत कधीही खोटे ठरले नाही. द्रव्य लोभाने नव्हे तर ज्ञानाच्या अनुभवानं, आत्मविश्वासाने मी हे भाकीत केले आहे ते कालत्रयी चुकणार नाही हे मूल जन्मजन्मांतरीचे पांग फेडेल. राणीसाहेब पापाचा घडा भरला आहे.धरित्री त्रस्त झाली आहे देवकी वसुदेव बंदीशाळेत असतानाच श्रीकृष्ण जन्माला आला. हे कृपा करून विसरू नका"
आपल्या तोंडात साखर पडो. जीजाबाई समाधानाने म्हणाल्या त्यांची नजर कुशीतल्या बाळाकडे गेली. मुठी चोखीत ते शांतपणे झोपी गेले होते. सर्वांच्या चेह-यावर एक प्रकारचे समाधान झळकत होते. जणू शास्त्रीबुवांनी भविष्य सांगत असतानाच या तेजस्वी पुत्राने शिवनेरी जिंकला होता.
लेखनआधार - श्रीमानयोगी
#DoodleOfShivray
शिवनेरी वर शिवाजी राजा जन्माला आले .
शके १५५१ फाल्गुन वद्य तृतियाला शिवनेरीवर जिजाबाई पोटी शिवरायांचा जन्म झाला. इंग्रजांच्या ख्रिस्ती कालगणनेनुसार ही तारीख १९ फेब्रुवारी १६३० अशी येते. शिवनेरीवरच्या शिवाई देवीवरून त्याचे नाव ठेवण्यात आले असे मानले जाते. खालच्या चित्रात दिलेल्या इमारतीत शिवाजीचा जन्म झाला असे मानले जाते. कालांतरात ह्या इमारतीची पडझड झाली होती त्यामुळे काही वर्षांपूर्वी त्याची पुनर्बांधणी केली गेली.
। शके १५५१ शुक्ल संवछरे ।
फालगुन वद्य त्रितीया नक्षत्र हास्त घटी १८ पळे ३१ गड ५
पळे ७ ये दिवसी राजश्री सिवाजी राजे सिवनेरीस उपजले ।।
काही इतिहासकारांनी शिवरायांची जन्म तारीख शके १५४९ वैशाख शुद्ध द्वितीया, म्हणजे ७ ऐप्रिल १६२७ अशी सांगितली होती. पण नंतर हाती आलेल्या साधनांमुळे ती फाल्गुन वद्य तृतिया आहे हे सिद्ध झाले. त्यावेळचे इंग्रजी वर्ष इतर जगाच्या ११ दिवस मागे असल्याने तेव्हाची जागतिक कालमापन पद्धती वापरली तर फाल्गुन वद्य तृतिया ही १ मार्च १६३० रोजी येते.
भूबाणप्राणचंद्राब्दैः सम्मिते शालिवाहने ।
शके संवत्सरे शुक्ले प्रवृत्ते चोत्तरायणे ।।
शिशिरर्तौ वर्तमाने प्रशस्ते मासे फाल्गुने ।
कृष्णपक्षे तृतीयायां निशि लग्ने सुशोभने ।।

संदर्भग्रंथ :
• राजा शिवछत्रपती, पृष्ठ ७६
• श्री राजा शिवछत्रपती खंड २, पृष्ठ ५६२-६४९
• ऐतिहासिक शकावल्या, पृष्ठ १३

साभार : शिवभक्त विनोद जाधव
#DoodleOfShivray

युगपुरुष

ज्या पुरूषास कधी कोणतेही दुर्व्यसन शिवले नाही,ज्यांनी परस्त्रीस मातेसमान मानले,ज्यांनी स्वधर्माप्रमाणेच परधर्मास आदर दाखवला,ज्यांनी युद्धात पाडाव केलेल्या शत्रूचे लोकांस त्यांच्या जखमा बर्या करून स्वगृही पाठवले,ज्यांनी फौज,किल्ले,आरमार इत्यादी योजनांनी स्वदेशसंरक्षणाची योग्य तजविज करून ठेवली , ज्यांनी सर्वांचे आधी स्वतः संकटात उडी घालून आपल्या लोकांस स्वदेशाची सेवा करण्यास शिकवले,ज्यांनी अनेक जिवावरच्या प्रसंगी केवळ बुद्धीसामर्थ्याने स्वतःचा बचाव केला,
ज्यांनी औरंगजेबासारख्या प्रतापी बादशहाचे भगीरथ प्रयत्न सतत तीस वर्ष पोवतो यत्किंचित चालू दिले नाहीत ,इतकेच नव्हे, तर तीन राज्यांचा पाडाव करून अखिल भारतखंडात अपूर्व असे स्वराष्ट्राचे स्वतंत्र राज्य स्थापन करून,त्याची किर्ती पृथ्वीवर अजरामर करून ठेवली; त्या प्रतापी व पुण्यशिल पुरूषाची योग्यता पूर्णपणे वर्णन करण्यास कोण समर्थ आहे! पुण्यात प्रत्यक्ष राहत्या वाड्यात पाच वर्ष्े पावतो औरंगजेबाचे सुभेदार तळ ठोकून बसले,तेव्हा त्याची ती मगरमिठी सुरतेचे नाक दाबून मोठ्या युक्तीने शिवाजी महाराजांनी सोडवली,या त्यांच्या युद्धकौशल्याची इतिहास सदैव तारीफच करत राहील.कोणास कधी जागिरी अगर जमिनी तोडून न देणारे, न्यायाचे कामात कोणाची भीडमुर्वत न धरणारे,दुष्टांचा काळ पण गरिबांचा कनवाळू,एकंदर रयतेस पोटच्या मुलांप्रमाणे वागवणारे,
सदैव सावध व उद्योगी,नेहमी मातेच्या अर्ध्या वचनात राहून सतत राष्ट्राची चिंता वाहणारे ; स्वदेश,स्वभाषा व स्वाभिमान या विविध संपत्तीचे संगोपन करणारे , दानशूर परंतु रणशुर ,असे हे आधुनिक काळाचे अद्वितीय स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजीमहाराज,जगातील जन्मलेल्या युगपुरूषांच्या पंक्तीत बसण्यास सर्वथैव पात्र आहेत.
 #DoodleOfShivray

घरोघरी शिवजयंती

पिचलेल्या रयतेच्या मनावर मायेची पाखरं घालणाऱ्या एका जाणत्या राजच्या जन्मसोहळ्याचा हा जागर
श्रीगणेशा पासून संगणकापर्यंतच्या प्रवासातील माणसाला माणूस म्हणून जगवणाऱ्या एका युगपुरषाच्या जन्मदिनाचा हा उत्सव. 
हयातभर मरण पाठीशी बांधून मुलुखभर दौड़ घेणाऱ्या लाखोंच्या पोशिंदयाच्या जयंती सोहळ्याचा हा आनंदोत्स. 
19 फेब्रुवारी 2016 राजं येतायती तेव्हा सगळ्यांना एक आवर्जून अर्जी ज्यांना शक्य असेल त्यांनी हा DP आपल्या प्रोफाईलला लावून शिवजन्माची वातावरण निर्मिती करावी ही विनंती विशेष _^_
आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची
 #DoodleOfShivray

दुर्गविज्ञान‬


महाराष्ट्र हा दुर्गाचा प्रांत! सह्यपठारावर आपण जर नजर फिरवली तर, चार-दोन शिखरांआड एखादा किल्ला तट बुरुजांचा शेला पागोटा मिरवत दिमाखाने उभा असतो. यातील बहुतेक दुर्ग श्रीशिवछत्रपतींची पायधूळ आपल्या मस्तकी मळवट भरल्याप्रमाणे धारण करून अभिमानाने मिरवत उभे आहेत. या शिवस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्राची तीर्थक्षेत्रे आज मात्र उपेक्षेच्या गर्तेत गेलेली आहेत.
अनेक पिढय़ांनी अभिमानाने सांगावा, असा इतिहास ज्या ठिकाणी घडला त्यांचे साक्षीदार असणाऱ्या या पाऊलखुणा आज संवर्धनाच्या उपेक्षेत आहेत.. आजही साडेतीनशे वर्षांनंतर शिवरायांच्या स्थापत्यशास्त्राचे दर्शन गड बारकाईने पाहिला तर घडू शकतं! वयाच्या १५-१६ व्या वर्षी बांधून घेतलेल्या तोरणगडापासून ते पन्नाशीत उभारलेल्या कुलाबा किल्ल्यापर्यंतचा आपण बारकाईने, अभ्यासू वृत्तीने विचार केला तर शिवरायांच्या दुर्गविज्ञानाची दृष्टी सतराव्या शतकातही काळाच्या किती पुढे होती हे दिसून येते.
Post Source- Anonymous Websource

  #DoodleOfShivray

ll राजमुद्रा ll


 
 
............... ll राजमुद्रा ll ...............
" ll प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः
     शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ll "

मराठी :
प्रतिपदेचा चंद्र जसा वाढत जातो, आणि सरे विश्व त्याला जसे वंदन करते, तशीच तशीच ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल…..!!

English :
The glory of this Mudra of Shahaji’s son Shivaji (Maharaj ) will grow like the first day moon .It will be worshiped by the world & it will shine only for well being of people....
#अभिजातमराठी
। महाराजांचे आठवावे रूप, महाराजांचा आठवावा प्रताप ।
।। श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा ।।

|| #जय_भवानी | #जय_शिवाजी ||
#DoodleOfShivray

सोन्याचा नांगर

आई जिजाऊ नि पुण्याची शापित जमीन आपल्या मुलाच्या शिवरायांच्या हातून सोन्याच्या नागराने नांगरून घेतली...
शिवाजी महाराजांनी जमीनीचे मोजमापन केले... आणि शेतकऱ्यांना शेती वाटून देली.. शेतकऱ्याना वेळो वेळी कर्ज देली ... बि बियानाचा पुरवठा केला बैल जोड्या दिल्या... त्यांना शेती करण्यास प्रोसहान दिले ... नद्यांचे पाणी आडउन प्रत्येक्ष पिकांचा लागवडीस आनले... व मावळ्यांना सकतीचे आदेश केले कि...
“शेतकऱ्यान च्या गवताचा काडीला सुधा हात लाऊ नका... फळे भाज्या मोबतला देल्या शिवाय घेऊ नका ... लाकूड फाट्याची जर गरज असेल तर जिर्ण झालेलं झाड तोडा... पण त्या ठिकाणी नवीन झाडा लावा... एखाद्या गावात जर थांबले तर पाणवाट्या वरचा पाणी गर्जे पेक्षा जास्त घेऊ नका... झोपतानी तेलवातीचे दिवे विजून झोपा…”
आई आपल्या मुलावर जस प्रेम करते त्याच प्रमाणे ... हा राजा आपल्या रायतेची काळजी घेत असे ... म्हणून अस्मानी आणि सुलतानी एकाच वेळेस कोसळली असताना ... एकही शेतकऱ्यानि आत्महत्या केल्याचे इतिहासात नोंद नाही... हेच शिवशाही चं सगळ्यात मोठ श्रेय आहे...!!!!
|| जय जिजाऊ || जय शिवराय ||
लिखाण - प्रविण प्रताप गोधडे.
 #DoodleOfShivray




                                   आज ३५० वर्ष झाली तरी "शिवाजी" ही तीन अक्षरं त्रयलोकाला पुरून उरतात ही बाब साधी नाही!!
                                   आज ही शिवरायांचे चरित्र वाचताना आमच्या भोवताली लाखो दीप प्रज्वलित झाल्यासारखे वाटतात इतका दिव्यप्रकाश ह्या व्यक्तीमत्वात आहे!! मनाभोवती कधी अंधकार दाटला ना.. कि मग एकदा माझ्या राजाचं चरित्र हाती घेऊन बघा.. बघा हा इतिहास कसा भविष्य घडवतो!! एकाच व्यक्तिमत्वाला इतके पैलू कि अजूनही इतिहासकारांना त्याचा पूर्ण अभ्यास करता आला नाही.. एक जन्म अपुरा पडतो हा युगपुरुष समजून घ्यायला!!
                                   "छत्रपती शिवाजी महाराज" ही फक्त एक व्यक्ती नसून ही एक वृत्ती आहे.. हे आपण आधी ध्यानात घेतले पाहिजे.. ही वृत्ती समजून घ्या!! महाराज म्हणजे फक्त युद्ध, तलवारी नव्हे हे ध्यानात घ्या.. अर्थकारण, राजकारण, समाजकारण असे अगणित पैलू आपापल्या परीने समजून घेऊया!! हा युगपुरुष आधी मना मनात जन्मायला हवा.. प्रत्येकाच्या मनात जन्मूदे माझा राजा..!! म्हणून सांगतो तरुणांनो ह्या शिवजयंती आधी माझा राजा आपल्या मनात जन्मास येउद्या.. तो युगपुरुष, ती वृत्ती, ते नेतृत्व मनात उभं करूया.. आणि खर्या अर्थाने शिवजयंती साजरी करूया.. युगपुरुष शिवराय घरा घरात जन्मूद्या!!
जय जय शिवराया!!
लिखाण - मल्हार शेलार
 #DoodleOfShivray
           सह्याद्रीच्या भौगोलिक स्थितीचा शिवाजी महाराजांनी जितक्या कौशल्याने वापर करून घेतला तेवढा संपूर्ण भारतात कोणीही, कधीही केला नव्हता. मावळी प्रांतातील डोंगर-दऱ्यांमुळे इथे शत्रूंचा शिरकाव कठीण होता. कोकणात उतरायचे तर एका घाटाने उतरावे लागणार. यावेळी शत्रूला त्रास देता येतो. प्रतापगडाचे युद्ध हा भौगोलिक स्थितीचा कुशलतेने वापर करून केलेल्या युद्धाचा अप्रतिम नमुना आहे. उंबरखिंडीचे युद्ध हे डोंगराळ भागाचा फायदा उठवून आपल्यापेक्षा संख्येने अतिशय जास्त असणाऱ्या शत्रूला दाती तृण धरायला कसे लावू शकतात याचे उदाहरण आहे.
डोंगरदऱ्या सैन्य कसे खाऊन टाकतात ते इथे दिसते.
- वेध महामानवाचा (डॉ. श्रीनिवास सामंत).
 #DoodleOfShivray
 संदर्भ : आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

शिवराय.कॉम

फौलादी छातीमध्ये आजही अंगार बरसतो..
पराक्रम हा अमुचा पाहून काळ हि क्षण भर थबकतो
आली जरी शेकडो वादळे..कुणा समोरही नाही झुकणार..
मावळायची जात आमची.. हे जग आम्हीच जिंकणार….
राजे तुमच्या आठवणींनी उर भरून येतोय…
सह्याद्रीच्या खांद्यांवर मी आजही उभा आहे
तुमच्या कणखर इराद्यांची जाणीव मला आहे.
उभाच राहीन मी सांगेन गाथा तुमच्या पराक्रमाची !
आठवण सदा करून देईन मराठ्यांच्या इतिहासाची !!
|| जय शिवराय || जय शंभुराजे ||

#DoodleOfShivray
संदर्भ : शिवराय.कॉम  

महादुर्गपूजा




भारतात एकाच दिवशी एकाच वेळी 140 किल्यांवर महादुर्गपूजा **
जगप्रसिद्ध असलेला राजा म्हणजेच राजेशाही थाट,प्रजापती, युध्दनितीतज्ञ, गरीब जनतेचा कैवारी व पालणहार म्हणुन राजा माणला गेला असेल तर जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीवर जन्मलेला धुरंधर राजा श्री. शिवछत्रपती शिवाजी महाराज. अनेकजणांना राजांविषयी गर्व आहे तो फक्त स्वार्थासाठी पण आम्हाला गर्व आहे तो फक्त आणि फक्त या राजांसाठी. आम्हाला गड घ्यायचा नाही तर तो टिकवायचा आहे तो स्वार्थासाठी नव्हे तर राजांच्या किर्ती साठी. आम्हाला किल्यांवर इतिहास लिहायचा नाही तर राजांचा इतिहास सांगणारे तरूण घडवायचे आहेत. त्यांच्या ह्रदयात किल्ले आणि राजांचा जिव्हाळा ठासून भरायचा आहे. म्हणूनच किल्ले संवर्धनाबरोबरच दुर्गांवर दुर्गपूजा आपण राहत असलेल्या वास्तू प्रमाणेच प्रत्येक वर्षी 28 फेब्रुवारी रोजी आयोजित केली जात आहे.
गेल्या वर्षी महाराष्ट्रातील 81 किल्यांवर एकाच दिवशी दिंडोरी प्रणीत मोरे बाबा आणि किल्ले संवर्धक महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत असलेल्या ग्रुपच्या माध्यमातून आयोजित केली होती.
आज पुन्हा एकदा सांगताना अत्यानंद होत आहे की या वर्षी एकुण 140 व त्यापेक्षा जास्त किल्यांवर येत्या 28 /2/2016 रोजी महादुर्गपूजा आयोजित करण्यात येणार आहे. आणि विशेष म्हणजे या वर्षी इतर पाच राज्यांतील सामिल झालेल्या आमच्या ग्रुपमधील किल्ले संवर्धक ग्रुपने सहभाग नोंदवून एक आदर्श जागवण्याचा प्रयत्न केला आहे. आपणही आपल्या जवळच्या किल्यांवर पुजा आयोजित करणार असाल तर आम्ही देत असलेल्या मो. नंबरवर संपर्क साधून गडकोटांची संस्कृती जपण्यासाठी गडकोटांवर उपस्थितीत राहून सहभागी व्हावे ही विनंती.
#DoodleOfShivray  
खालील किल्यांवर दुर्गपूजा आयोजित केली आहे यामध्ये आपण भर घालावी ही सदिच्छा.
महाराष्ट्रातील किल्ले :
**सुभा पुणे **

1. सिंदोळा
2. निमगिरी
3. हडसर
4. जीवधन
5. चावंड
6. शिवनेरी
7. नारायणगड
8. भोरगिरी
9. संग्रामदुर्ग
10. राजमाची
11. लोहगड
12. विसापूर
13. तुंग
14. तिकोना
15. मोरगिरी
16. घनगड
17. कैलासगड
18. सिंहगड
19. कोरीगड
20. रायरेश्वर
21. कावळ्या
22. रोहिडा
23. तोरणा
24. राजगड
25. मल्हारगड
26. पुरंदर
27. वज्रगड
28. दौलतमंगल
29. शनिवारवाडा
** सुभा सातारा **
1. वारुगड
2. सुभानमंगळ
3. केंजळगड
4. जरंडा
5. अजिंक्यतारा
6. सज्जनगड
7. प्रतापगड
8. संतोषगड
**सुभा संभाजीनगर **
1. लहुगड
2. अंतुर
3. देवगिरी
4. भांगशी
5. अजंटा
6. सुतोंडा
**सुभा नाशिक **
1. रामसेज
2. हरगड
3. अंजनेरी
4. धोडप
**इतर **
1. प्रचितगड
2. पावनखिंड
3. विजयदुर्ग
4. सोलापूर
5. निवती
6. अवचितगड
7. पदमदुर्ग
8. पन्हाळा
9. हरिश्चंद्रगड
10. धारूर
11. भुदरगड
12. रायगड
13. सरसगड
14. कुलाबा
15. मंगळवेडा
16. रतनदुर्ग
17. पारोळा
18. वासई
19. सिंधुदुर्ग
20. झरांडा
21. सुवर्णदुर्ग
22. नंदुरबार
23. दुर्गवाडी
24. लळींग
25. कल्याण
26. फत्तेगड
27 कनकदुर्ग
28. गोवा
29. तळगड
इतर पाच राज्यातील किल्ले
1) भटिंडा - पंजाब
1) असिरगड - मध्यप्रदेश
1) इडर - गुजराथ
1) तारागड - राजस्थान
1) सरी - दिल्ली
2) कोटला
3) लाल किल्ला
4) इंद्रप्रस्थ
5) तुगळताबाद
6) आदिलाबाद
7) पूर्ण किल्ला
आपण संवर्धन कार्य करत असलेल्या
किल्ल्यावर पूजा करा अधिक माहिती साठी संपर्क करा मो.नं . 8888500055

#‎DoodleOfShivray‬

  

रायगड किल्ला

पराक्रमाने स्वराज्यांगणी तेजकार्य घडविले
कौशल्याने शब्दकोंदणी अतुल शौर्य जडविले
समर्थ दर्शन करी अरिमर्दने तिमिरहरण रविराज
रचितो वर्णन, करीतो वंदन शिवभूषण कविराज!!
१५ जानेवारी १६५६ रोजी शिवाजी महाराजांनी जय्यत तयारीनीशी जावळीवर हल्ला करुन मोर्यांचा धुव्वा उडवला. मोर्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला; तर प्रतापराव मोरे विजापूरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५७ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला.
महाराजांच्या पहिल्या रायगड भेटीचे वर्णन करतांना सभासद बखर म्हणते,"राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा."
शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग होय. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना होती. गडावरील राजसभेत दिनांक ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक संपन्न झाला. दिनांक २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी शु. ५ आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वत:ला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी याच्या हस्ते पार पडला.
कवी भूषण रायगडाचे वर्णन करतो की, 'शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वसतीस्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की, त्यात तीनही लोकींचे वैभव साठवले आहे. गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत. सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले.’
साभार: योगेश (जिप्सी) , मायबोली
जय शिवराय . . .. #DoodleOfShivray


Wednesday, 17 February 2016

‎शिवजयंती घराघरात‬


#‎शिवराय_मनामनांत‬ . .. 🚩 ‪#‎शिवजयंती_घराघरात‬ . ..
मित्रांनो घरोघरी शिवजयंती या उपक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
आपणा सर्वांना विनंती आहे की, आपण घरी सहकुटूंब साजरा केलेल्या शिवजयंतीचे फोटो ‪#‎घरोघरी_शिवजयंती‬ या हॅशटॅगसह फेसबुकवर अपलोड करावेत. आज तुम्ही घरी ‪#‎शिवजयंती‬ साजरी करताय, पुढील वर्षी तुमच्याकडून ‪#‎स्फुर्ती‬ घेऊन इतर लोकही घरी शिवजयंती साजरी करतील.
‪#‎टिप‬ : १) तुम्ही जर शिवजयंती निमित्त आयोजीत केलेल्या सार्वजनिक कार्यासाठी बाहेर जाणार असाल तर घरातील इतर सदस्यांना शिवजयंती साजरी करायला प्रोत्साहीत करा.
२) शिवजयंतीस कोणत्याही कर्मकांडांचे स्वरूप देऊ नका. घरी शिवजयंती साजरी करत असताना शिवरायांच्या प्रतिमेसमोर नारळ फोडणे, नैवद्य दाखवणे असे तत्सम प्रकार टाळावेत.
३) शिवरायांना देव म्हणून नाही तर ‪#‎आदर्श‬ जिवन जगण्यासाठीचे ‪#‎प्रेरणास्त्रोत‬ म्हणून ‪#‎वंदन‬ करा.

#घरोघरी_शिवजयंती 🚩
‪#‎DoodleOfShivray‬